अकोटात देशी कट्टा बनविण्याचे साहित्य दोघांकडून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:00 AM2017-09-29T02:00:40+5:302017-09-29T02:00:40+5:30
अकोला : देशी कट्टा बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून देशी कट्टा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली असून, यामध्ये अकोट येथील मो. शफी मो. युनूस व अहमद तौकिफ अहमद हाफीस या दोन आरोपींचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोट तालुक्यातील चिचारी येथील रहिवासी मो. शफी मो. युनूस व अकोटातील ताहपुरा येथील रहिवासी अहमद तौकिफ अहमद हाफीस हे दोघे जण देशीकट्टा बनविण्याचे साहित्य घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भगतवाडीनजीकच्या स्मशानभूमीजवळ पाळत ठेवली असता, हे दोन आरोपी साहित्य घेऊन जात असतानाच त्यांना पकडले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सहा इंच लांबीचा लोखंडी पाइप, लाखंडाचे चौकट भाग, तीन लोखंडाचे स्प्रिंग, लोखंटी नट-बोल्ट, ट्रिगरसाठी वापरण्यात येणारी लोखंडी पट्टी, दोन जिवंत काडतूस आणि एक लहान जिवंत काडतूस, असा एकूण दोन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हे साहित्य देशी कट्टा बनविण्याचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर मो. शफी मो. युनूस व अहमद तौकिफ अहमद हाफीस या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.