अकोटात देशी कट्टा जप्ती प्रकरणात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:15 AM2017-10-23T01:15:33+5:302017-10-23T01:15:40+5:30
अकोट : अकोट बसस्थानक परिसरात अकोट शहर डी.बी. प थकाने उमरा येथील अजय मन्साराम चव्हाण या २२ वर्षीय युवकाजवळून देशी कट्टा जप्त केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वीसुद्धा अकोला येथे अकोट येथील एका इसमाजवळून बंदूक बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोट बसस्थानक परिसरात २२ वर्षीय युवकाजवळ अवैधरी त्या देशी कट्टा असल्याची माहिती अकोट पोलिसांना २१ ऑ क्टोबरच्या रात्री मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई, डी.बी. पथकाचे हे.काँ. यशवंत शिंदे, जितेंद्र कातखेडे, रोहित ितवारी, राहुल वाघ, वीरेंद्र लाड यांनी उमरा येथील रहिवासी आरोपी अजय मन्साराम चव्हाण याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सात हजार रुपये किमतीचा देशी कट्टा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याजवळील एम एच ३0 ए एम ३९४६ क्रमांकाच्या मोटारसायकलसह एकूण ३७ हजार ४00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी अजय मन्साराम चव्हाणविरुद्ध आर्मस् अँक्टच्या ३, २५ कलमानुसार गुन्हा दाखल केला.