रोख रक्कम पळविली
By admin | Published: April 24, 2017 01:49 AM2017-04-24T01:49:59+5:302017-04-24T01:49:59+5:30
अकोला- पेट्रोल भरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या दुचाकीस्वाराकडून दोघांनी एक हजार २०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकल्याची घटना रविवारी घडली.
अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या उमरी परिसरातील पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या दुचाकीस्वाराकडून दोघांनी एक हजार २०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. लुटमार, दरोड्यातील आरोपीच सिव्हिल लाइनमध्ये ठिय्या मांडून बसत असल्याने त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
दहीगाव गावंडे येथील रहिवासी पुरुषोत्तम आठवले हे उमरी परिसरातील पेट्रोल पंपवर उभे असताना दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांच्या दुचाकीवर बसले. त्यांनी दोघांनाही दुचाकीवरून उतरण्यास सांगताच त्यांनी आठवले यांना धाकदपट करीत त्यांच्याकडील एक हजार २०० रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढला.भरदिवसा अशाप्रकारे लुटमार करण्यात येत असल्याने सिव्हिल लाइन पोलिसांचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.