बँकेच्या कॅशिअरनेच खातेदारांचे पैसे पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 10:17 AM2020-11-01T10:17:08+5:302020-11-01T10:19:58+5:30

Akola Crime News संगणकामध्ये त्याची नोंदच करायची नाही व सदर रक्कम खिशात ठेवायची, असा प्रकार उघडकीस आला आहे.

The cashier of the bank stole the money of the account holders! |   बँकेच्या कॅशिअरनेच खातेदारांचे पैसे पळविले!

  बँकेच्या कॅशिअरनेच खातेदारांचे पैसे पळविले!

Next
ठळक मुद्देबँकेच्या व्यवस्थापकांनी खुद्द खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कॅशिअरविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

अकोला : खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विदर्भ क्षेत्रीय काेंकण ग्रामीण बॅंंकेच्या कॅशिअरने बचत गटाचे प्रतिनिधी बँकेत पैसे भरण्यासाठी आल्यानंतर त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांना पावती द्यायची. पासबुकमध्ये नोंदही करून घ्यायची; मात्र संगणकामध्ये त्याची नोंदच करायची नाही व सदर रक्कम खिशात ठेवायची, असा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रताप खुद्द बँकेच्या कॅशियर ने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांनी खुद्द खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कॅशिअरविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे मलकापूर येथील शाखा व्यवस्थापक प्रमोद मनोहरराव पाटील यांच्या तक्रारीवरून तत्कालीन रोखपाल वसंत नरसुजी गायकवाड वय ५५ रा. कोठारी वाटिका क्र. ३ गुरूपुष्प नगर मलकापूर याच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी रोखपाल २०१६पासून बँकेत रोखपाल पदावर कार्यरत आहे. लोकनायक पुरुष बचत गटाचे प्रतिनिधी बँकेत पैसे भरण्यासाठी गेले असता, त्यांच्याकडून ३२ हजार ११० रुपये राेखपाल यांनी घेतले. त्यानंतर पैसे भरण्याची पावती त्याने संबंधित बचत गटाला स्वत:च्या स्वाक्षरी व बँकेच्या शिक्क्याने दिली व त्याबद्दलची नोंद पासबुकमध्ये संबंधित बचत गटाला संगणकीय बचत खाते असतानासुद्धा स्वत:च्या हस्ताक्षरात करून दिली. संगणकामध्ये नोंद घेणे अपेक्षित असताना तसे केले नाही. त्यानंतर बँकेचे कर्जदार सुभाष तुकाराम मंगल यांनीसुद्धा २ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे कर्ज भरण्यासाठी बँकेत गेले असता, आरोपीने त्यांनासुद्धा स्वतःच्या स्वाक्षरीने बँकेच्या शेतकऱ्याने पावती दिली व सदर घटनेची नोंद संगणकामध्ये केली नाही. अशा अनेक ग्राहकांचे पैसे रोखपाल याने हडपले. जेव्हा ग्राहक त्यांच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता, त्यांना त्यांच्या खात्यात भरलेली रक्कम दिसून न आल्याने त्यांनी शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, शाखा व्यवस्थापकांनी चौकशी केली. चौकशीमध्ये रोखपाल यांनी घोटाळा केल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस कारवाई करू नका, असे म्हणून रोखपालने काही ग्राहकांचे पैसेही परस्पर भरले. त्यानंतर विभागीय चौकशी केली असता, त्यामध्ये सदर रोखपाल दोषी असल्याचे आढळून आला. अनेक ग्राहकांची फसवणूक केल्याने बँकेची बदनामी झाली म्हणून व्यवस्थापकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून खदान पोलिसांनी सदर रोखपालविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४०८ नुसार गुन्हा दाखल केला आहे

Web Title: The cashier of the bank stole the money of the account holders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.