वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी शिक्षकांना मिळणार कॅशलेस कार्ड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:48 AM2017-09-11T02:48:17+5:302017-09-11T02:48:37+5:30
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी येत्या १ एप्रिल २0१८ पासून कॅशलेस प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी मार्चअखेरपर्यंत शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्यांना कॅशलेस कार्ड वितरित करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विजुक्टा व महासंघाच्या पदाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी येत्या १ एप्रिल २0१८ पासून कॅशलेस प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी मार्चअखेरपर्यंत शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्यांना कॅशलेस कार्ड वितरित करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विजुक्टा व महासंघाच्या पदाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
शिक्षण क्षेत्र व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शिक्षण सचिवांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, विजुक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. संजय शिंदे, प्रा. विलास जाधव, प्रा. अनिल तळेकर, प्रा. टकले यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये अंशत: अनुदानित शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत शिक्षण विभाग अनुकूल असून, वित्त विभागाशी पाठपुरावा करून बाजू मांडण्याचे शिक्षण विभागाने मान्य केले. नोव्हेंबर २00५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिक्षण विभाग पाठपुरावा करणार आहे. २ मे २0१२ नंतर नियुक्त शिक्षकांना तातडीने मान्यता देण्याचे मान्य केले. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करणे व माध्यमिकप्रमाणे अनुदानासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यावर्षीची संचमान्यता प्रचलित निकषांनुसार करण्याचेही शिक्षण विभागाने मान्य केले. १७१ मान्यता पदांच्या वेतनाची तरतूद दिवाळीपूर्वी करण्याचे, शालार्थ प्रणालीत प्रलंबित शिक्षकांची नावे दाखल करण्याचे निर्देश ना. तावडे यांनी दिले. डीसीपीएस खाती अद्ययावत ठेवण्याची, आयटी शिक्षकांना मान्यता, प्लॅन संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर करण्याबाबत प्रयत्न आणि सरसकट निवडश्रेणी प्रस्ताव पडताळणी, ४२ दिवसांच्या रजा, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली, अशी माहिती विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश वानखडे, प्रा. संजय देशमुख, प्रा. संजय गोळे, प्रा. प्रवीण ढोणे, प्रा. डी.एस. राठोड, प्रा. संतोष अहिर यांनी दिली.