कॅसिनी इतिहासातील सर्वात यशस्वी मिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:14 AM2017-09-16T01:14:11+5:302017-09-16T01:16:12+5:30

देशात गरिबी आहे आणि आपण मंगळयान का पाठवितो, अशा प्रश्नांवर दहा वर्षांपूर्वी लोक चर्चा करीत असायचे. आता मात्र, याच लोकांना अवकाशयान राष्ट्राच्याच नव्हे, तर विश्‍वाच्या भवितव्यासाठी हे आवश्यक असल्याचे पटायला लागले आहे. शुक्रवारी नासाच्या शास्त्रज्ञांनी कॅसिनी अवकाशयानाची यशस्वी मोहीम संपविली. कॅसिनी हा कृत्रिम उपग्रह शनीवर आदळविण्यात आला.  इतिहासातील सर्वात यशस्वी ग्रहाच्या विज्ञान मोहिमेंपैकी ही एक मोहीम आहे, असे कुतूहलचे संचालक नितीन ओक यांनी सांगितले.

Cassini's most successful mission in history | कॅसिनी इतिहासातील सर्वात यशस्वी मिशन

कॅसिनी इतिहासातील सर्वात यशस्वी मिशन

Next
ठळक मुद्देनितीन ओक यांचे प्रतिपादन ‘द ऐंड फॉर न्यू बिगनिंग’ या विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: देशात गरिबी आहे आणि आपण मंगळयान का पाठवितो, अशा प्रश्नांवर दहा वर्षांपूर्वी लोक चर्चा करीत असायचे. आता मात्र, याच लोकांना अवकाशयान राष्ट्राच्याच नव्हे, तर विश्‍वाच्या भवितव्यासाठी हे आवश्यक असल्याचे पटायला लागले आहे. शुक्रवारी नासाच्या शास्त्रज्ञांनी कॅसिनी अवकाशयानाची यशस्वी मोहीम संपविली. कॅसिनी हा कृत्रिम उपग्रह शनीवर आदळविण्यात आला.  इतिहासातील सर्वात यशस्वी ग्रहाच्या विज्ञान मोहिमेंपैकी ही एक मोहीम आहे, असे कुतूहलचे संचालक नितीन ओक यांनी सांगितले.
कुतूहल संस्कार केंद्राच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी पालक व विद्यार्थ्यांसाठी ‘द ऐंड फॉर न्यू बिगनिंग’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यामध्ये नितीन ओक यांनी कॅसिनी उपग्रहाविषयी माहिती दिली. कॅसिनी हा कृत्रिम उपग्रह शनीवर आदळविण्यात आला. या मोहिमेला २0 वर्ष लागली. या यशस्वी मोहिमेतील क्लिष्ट माहिती अत्यंत सोप्या भाषेत आणि अधिक रंजक करू न ओक यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
मनुष्याला नेहमी प्रश्न पडतो. मी कसा आलो. देवाने घडविला तर तो कसा, एक एक प्रश्नांची उकल करीत असतानाच सूर्य, पृथ्वी, आकाश, समुद्र असे विश्‍वाचे गूढ उकलायला लागले. यामध्ये काहीतरी तथ्य असावे, याकरिता पुढे त्याला अध्यात्म व धार्मिकतेची जोड देण्यात आली. पण, याचे मूळ विज्ञानच आहे. ग्रहांचे आणि उपग्रहांचे शोध मनुष्याने लावले. आता कृत्रिम कॅसिनी उपग्रहाने अनेक नवीन शोध लावलेत. यामध्ये सर्वात आनंदाची बाब म्हणजे अवकाशात पाणी असल्याचाही कॅसिनीने शोध लावला, असे ओक यांनी सांगितले.
कॅसिनी २२ फूट उंच आणि १३ फूट जाडीचा होता. अवकाश यान कॅसिनी १५ सप्टेंबर रोजी अंतिम यात्रेला तयार होता. जेपीएल जेथे बांधले आणि ऑपरेट केले गेले, ते १९९७ मध्ये सुरू  करण्यात आले. ३0 जून २00४ मध्ये शनीच्या कक्षेत प्रवेश करण्यात आला. पुढे शनीच्या रिंगची संरचना प्रकट केली. त्याने बाह्य सौर प्रणालीमध्ये अवकाश यात्रेचे पहिले उद्दिष्ट पूर्ण केले.  मिथेन लेकची जमीनचाही शोध घेतला. तसेच पाणी प्रवाहित झाल्याचेही दिसले. ही विश्‍वासाठी आनंदाची बाब आहे आणि हा सर्वात मोठा शोध असल्याचे ओक म्हणाले.

Web Title: Cassini's most successful mission in history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.