जाती-पातीच्या राजकारणात खरा कार्यकर्ता पडला मागे !
By admin | Published: September 25, 2014 02:51 AM2014-09-25T02:51:39+5:302014-09-25T03:08:56+5:30
अकोला लोकमत परिाजकीय पक्षाच्या पदाधिका-यांना खंत
अकोला : लोकशाहीमध्ये निवडणुका हा अपरिहार्य भाग आहे; परंतु निवडणुकांमध्ये विकासाचा मुद्या बाजूला पडून ऐनवेळी जातीपातीचा मुद्या पुढे येतो. यामध्ये दुर्दैवाने खरा कार्यकर्ता मागे पडतो. मतदारसंघाच्या विकासासाठी हे थांबविणे गरजेचे आहे. जातीच्या आधारावर नाही तर प्रामाणिक कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाने पुढे केले पाहिजे, असे मत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी बुधवारी ह्यलोकमतह्णच्या मंचावर व्यक्त केले.
ह्यलोकमतह्णच्यावतीने बुधवारी ह्यविधानसभा निवडणुकीत मुद्देच शिल्लक नाही, त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवार निवडण्यापासूनच सर्व प्रक्रिया जाती-पातीच्या आधारावर होत आहेह्ण या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष मदन भरगड, भाजपाचे महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, भारिपचे महापालिका गटनेते गजानन गवई आदी सहभागी झाले होते. सर्वच पदाधिकार्यांनी जातीपेक्षा विकासाच्या मुद्यावर भर दिला. जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्याची धमक असणार्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. सर्वच पक्षात चांगले काम करणारे कार्यकर्ते आहेत; परंतु या कार्यकर्त्यांच्या जातीला पाठबळ नसल्यामुळे ते मागे पडतात आणि गुणवत्ता नसतानादेखील जातीचे पाठबळ असणार्यांना संधी मिळते, हे कुठेतरी आता थांबणे गरजेचे आहे.