जात, धर्माच्या नावावर हल्ले थांबवा!
By admin | Published: July 8, 2017 02:18 AM2017-07-08T02:18:45+5:302017-07-08T02:18:45+5:30
नागरिकांनी दिले ‘मूक धरणे’ : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जात आणि धार्मिक उन्मादातून करण्यात येणारे हल्ले आणि हत्यांचा निषेध करीत जात, धर्म व पंथाच्या नावार होणारे हल्ले तातडीने थांबविण्यात यावे, या मागणीसाठी अकोल्यातील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक धरणे’ दिले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
देशात जात, धर्म उन्मादातून दररोज होणारे हल्ले आणि हत्याकांडात निरपराध नागरिकांच्या हत्या, जाळपोळ व मारहाणीच्याविरोधात ‘माझ्या नावावर अत्याचार नको’ (नॉट इन माय नेम) मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत देशात जात, धर्म, पंथाच्या नावावर कोणत्याही व्यक्ती व समूहावर हल्ले करणे व जीव घेणे थांबले पाहिजे, केंद्र सरकारने याबाबत दखल घेऊन विघातक प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई करावी, विशिष्ट धर्म किंवा विचारधारेचा प्रसार-प्रचार थांबविण्यात यावा, सामाजिक सलोखा बंधुभाव कायम राहावा, प्रत्येक नागरिकाने देशाच्या संविधानाप्रमाणे वर्तन करावे, यासाठी सरकारने पावले उचलून आतापर्यंत झालेले हल्ले व हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, दोषींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना शिक्षा देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी अकोल्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक धरणे’ आंदोलन केले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात माजी राज्यमंत्री अजहर, गुलाबराव गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डॉ. पुरुषोत्तम तायडे, सत्यपाल महाराज, राजेंद्र पातोडे, काझी नाझीमोद्दीन, मुफ्ती अशफाक कासमी, भन्ते श्रीलाभ, डॉ. सुभाष तिवारी, मजहर खान, पंकज जायले, भन्ते पूजानंद थेरो, साजीदखान पठाण, शहजाद अन्वर, धनंजय मिश्रा, डॉ. जिशान हुसेन, डॉ. नीलेश पाटील, अशोक पटोकार, मार्तंडराव माळी, प्रा. राजाभाऊ देशमुख, अजय तापडिया, श्रीकांत पिसे, सै. अलीमोद्दीन हाजी तौफीक अली, हामीद हुसेन, अविनाश नाकट, वली मोहम्मद, प्रा. सरफराज खान, पुरुषोत्तम आवारे, श्याम अवस्थी, मनोहर पाटील, प्रभजितसिंह बछेर, सुरेश पाटील, सरदारखा महेमुदखा, अविनाश देशमुख, पी.जे. वानखडे, मो. अतिकुर रहेमान, जावेद जकारिया, अन्वर शेरा, आसीफ अहमद खान, कपिल रावदेव, अॅड. प्रवीण तायडे, प्रतिभा अवचार, प्रा. मधू जाधव, गौरव कोहचडे, शाहीद खान, शरद वानखडे, नितीन सपकाळ, निर्भय पोहरे, दीपकराज डोंगरे, सैयद नासीर यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.