चीन उत्पादित वस्तूंच्या बहिष्कारासाठी ‘कॅट’ राबविणार राष्ट्रीय मोहीम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 02:22 PM2019-02-22T14:22:49+5:302019-02-22T14:22:54+5:30
अकोला: चीन उत्पादित वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार घालून पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आवाहन राष्ट्रीय ‘कॅट’चे सचिव अशोक डालमिया यांनी केले असून, यासंदर्भात ‘कॅट’ राष्ट्रीय अभियान सुरू करीत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली आहे.
- संजय खांडेकर
अकोला: चीन उत्पादित वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार घालून पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आवाहन राष्ट्रीय ‘कॅट’चे सचिव अशोक डालमिया यांनी केले असून, यासंदर्भात ‘कॅट’ राष्ट्रीय अभियान सुरू करीत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली आहे.
पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ सीआरपीएफ जवानांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल, तर पाकिस्तानची चौफेर कोंडी करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाकिस्तानला मदत करणाºयांनादेखील धडा शिकवावा लागेल. तेव्हाच ते पाकिस्तानला मदत करणे थांबवतील, असे ‘कॅट’चे मत आहे. ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांच्या नेतृत्वात चीन उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम तीव्र केली जात आहे. चीन हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा समर्थक असून, आर्थिकसह इतरही मदत तो पाकिस्तानला करीत असतो. दुसरीकडे चीनची संपूर्ण बाजारपेठ भारताच्या भरवशावर आहे. चीनची प्रत्येक वस्तू भारतात विकल्या जाते. जर आम्ही चीनच्या उत्पादित वस्तूंवर बहिष्कार घातला तर चीनची आर्थिक व्यवस्था कोलमोडण्याची शक्यता आहे. पर्यायाने त्याला पाकिस्तानची मदत थांबवावी लागेल. चीन आणि पाकिस्तान यांना धडा शिकविण्यासाठी भारतीयांनी चीन उत्पादित वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे, असा सामाजिक संदेश देत कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे, अशी माहिती राष्ट्रीय ‘कॅट’चे सचिव अशोक डालमिया यांनी दिली आहे.
कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने देशभरातील चीन निर्मित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, हे अभियान राबविण्यासाठी मोहीम उघडली जात आहे. चीन निर्मित साहित्यावर बहिष्कार घालण्यासाठी मोर्चे काढून जनजागृती करण्याचादेखील कार्यक्रम आहे. सोबतच आगामी मार्चमध्ये येत असलेल्या होळीमध्ये चीन उत्पादित वस्तू जाळण्याचे आवाहन ‘क ॅट’तर्फे केले जाणार आहे. व्यापारी-उद्योजक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.