गुरांचे बाजार बंदच; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:41+5:302021-06-21T04:14:41+5:30

---------------------- नागरिकांची नाडी बोगस डाॅक्टरांच्या हाती बार्शीटाकळी : ग्रामीण भागात आता कोरोना महामारीच्या संकटात बोगस डाॅक्टर सक्रिय झाले आहेत. ...

Cattle market closed; Farmers suffer | गुरांचे बाजार बंदच; शेतकरी त्रस्त

गुरांचे बाजार बंदच; शेतकरी त्रस्त

Next

----------------------

नागरिकांची नाडी बोगस डाॅक्टरांच्या हाती

बार्शीटाकळी : ग्रामीण भागात आता कोरोना महामारीच्या संकटात बोगस डाॅक्टर सक्रिय झाले आहेत. शहरातील महागडा उपचार गरीब रुग्णांना झेपणारा नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने ते बोगस डाॅक्टरांकडे जात आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

--------------------------

खताची दरवाढ; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

तेल्हारा : शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशातच रासायनिक खताचे भाव वधारले असून, त्यामुळे लागवड खर्च दुपटीवर जाण्याची शक्यता आहे. या समस्येवर शासनाकडून मात्र कोणताच निर्णय घेताना दिसत नाही. खताचे दर कमी करण्याची मागणी होत आहे.

-----------------------

बाळापूर तालुक्यातील स्मशानभूमींची दैना

बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दैनावस्था झाली आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मशानभूमींची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

------------------------------

अकोट तालुक्यात अवैध वृक्षतोडीला जोर

अकोट : तालुक्यातील जंगलात अवैध वृक्षतोडीला जोर आला आहे. सागवान तस्कर सक्रिय झाले आहे. रात्री जंगलातील लाकूड तोडले जात आहे. अंधाराचा लाभ उचलून त्याची वाहतूक केली जात आहे. वन विभागाच्या गस्तीची गरज आहे.

------------------

अकोला तालुक्यात वन्यप्राण्यांची गावाकडे धाव

अकोला : तालुक्यातील जंगलांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. यातून मानव आणि प्राणी असा संघर्ष निर्माण झाला आहे. वनविभागाने जंगलातच पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.

------------------------

दिग्रस परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्याने चिंतेत भर

दिग्रस बु. : परिसरातील गावांमध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घराच्या परिसरातील दैनंदिन उपयोगाच्या वस्तू लंपास केल्या जात आहेत. माेठी वस्तू जात नसल्याने नागरिकही तक्रारी देण्यास पुढे येत नाहीत. गत दोन-तीन महिन्यांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

-----------------------

विविध योजनेतील घरकूल रखडले

अकोला : जिल्ह्यातील अनेक लाभार्थींना विविध योजनांतून घरकूल मंजूर झाले. सुरुवातीला रेतीअभावी बांधकामे रखडली. आता बांधकामाला लाॅकडाऊनचा फटका बसत आहे. मजूर मिळत नसल्याने लाभार्थींची परवड होत आहे.

----------------------

निराधार, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा

अकोला : जिल्ह्यातील निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याकडे संबंधित विभागाने दखल घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

----------------------

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

अकोला : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते; मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे.

Web Title: Cattle market closed; Farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.