दुष्काळात जनावरांना मिळेना भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:50 PM2019-01-14T12:50:13+5:302019-01-14T12:50:55+5:30
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत जनावरे विकण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना भाव मिळत नसल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत जनावरे विकण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना भाव मिळत नसल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील सर्व गावांसह अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नापिकीच्या स्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. नापिकीच्या स्थितीत चाºयाच्या उत्पादनातही घट झाली आहे. येत्या काही दिवसांत पाणी आणि चाराटंचाईची परिस्थिती आणखी तीव्र होणार असल्याने, जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे; मात्र बाजारातही भाव मिळत नसल्याने मिळणाºया कमी दरात शेतकºयांना जनावरे विकावी लागत आहेत.
बाजारात जनावरांना
असा मिळत आहे भाव!
एक लाख रुपये किमतीच्या बैलजोडीला बाजारात ६० ते ६५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. ५५ हजार रुपये कि मतीच्या म्हशीला ३५ ते ४० हजार रुपये, ६ ते ७ हजार रुपये किमतीच्या शेळीला ३ ते ४ हजार रुपयांचा भाव मिळत असून, दुभत्या गायी-म्हशी आणि वहितीकरिता तयार होणाºया गुरांनाही बाजारात कमी भाव मिळत असल्याचे वास्तव आहे.
पाणी-चारा कोठून आणणार?
टंचाईच्या परिस्थितीत जिथे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, तेथे जनावरांना जगविण्यासाठी पिण्याचे पाणी आणि चारा कोठून आणणार, याबाबतची चिंता पशुपालक शेतकºयांना सतावत आहे. त्यामुळे मिळणाºया कमी भावात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
कडबा पेंढीचे भाव शेकडा पाच हजार रुपये!
दुष्काळी परिस्थितीत चाºयाच्या उत्पादनात घट झाल्याने, चाºयाचे भाव वधारले आहेत. त्यामध्ये सध्या कडबा पेंढीचे भाव शेकडा पाच हजार रुपये असून, २० किलो कडबा कुट्टी पोत्याचे भाव ३४० रुपये आहेत.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाणी आणि चाराटंचाईच्या परिस्थितीत जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे; परंतु जनावरांना कमी भाव मिळत असून, मिळेल त्या भावात शेतकºयांना जनावरे विकावी लागत आहेत.
-शिवाजी भरणे,
शेतकरी, रामगाव, ता. अकोला.