१६ क्विंटल कॅरीबॅगचा साठा पकडला! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:49 AM2017-09-26T01:49:05+5:302017-09-26T01:49:05+5:30

अकोला : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानासुद्धा शहरात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची होलसेल विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिक ा उपायुक्त समाधान सोळंके यांनी पुन्हा एकदा १६ क्विंटल कॅरीबॅगचा साठा पकडण्याची कारवाई केली. यावेळी संबंधितांना दीड लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. 

Caught 16 kilograms of Keribag! | १६ क्विंटल कॅरीबॅगचा साठा पकडला! 

१६ क्विंटल कॅरीबॅगचा साठा पकडला! 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानासुद्धा शहरात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची होलसेल विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिक ा उपायुक्त समाधान सोळंके यांनी पुन्हा एकदा १६ क्विंटल कॅरीबॅगचा साठा पकडण्याची कारवाई केली. यावेळी संबंधितांना दीड लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. 
 सोमवारी रेल्वेच्या मालधक्का परिसरात आरोग्य निरीक्षकांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये सात क्विंटल कॅरीबॅगचा साठा आढळून आला. हा साठा कमल चावला यांचा असल्यामुळे उपायुक्त समाधान सोळंके यांनी चावला यांना ५0 हजारांचा दंड ठोठावला. यादरम्यान, पूर्व झोन अंतर्गत न्यू क्लॉथ मार्केटस्थित संगम होजिअरी प्रतिष्ठानची तपासणी केली असता, नऊ क्विंटल कॅरीबॅगचा साठा आढळून आला. याप्रकरणात रमेश धिंग्रा यांना एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाशिम बायपास रोडवरील जी.आर. चिल्ड्रेन हॉस्पिटलच्यावतीने मनपाच्या घंटागाडीत बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात आला असता हॉस्पिटल प्रशासनावरही २५ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त समाधान सोळंके, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, नंदकिशोर उजवणे यांसह आरोग्य निरीक्षकांनी पार पाडली. 
-

Web Title: Caught 16 kilograms of Keribag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.