झाडावर असलेल्या अजगराला पकडून दिले जीवदान; आलेगाव वन परिक्षेत्रांतर्गतील घटना
By रवी दामोदर | Published: September 23, 2022 04:03 PM2022-09-23T16:03:39+5:302022-09-23T16:03:55+5:30
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील एका शेतात मजूर काम करीत असताना त्यांना झाडावर अजगर बसून असल्याचे दिसून आले.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील एका शेतात मजूर काम करीत असताना त्यांना झाडावर अजगर बसून असल्याचे दिसून आले. आठ ते दहाफूट लांबीचा अजगर पाहताच मजुरांची तारांबळ उडाली. दरम्यान मजुरांनी वन विभागाला माहिती देताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून अजगराला पकडून जंगलामध्ये सोडून दिले. त्यानंतर मजुरांनी सुटकेचा स्वास घेतला.
आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आलेगाव शिवारातील एका शेतात काही मजूर काम करीत होते. दरम्यान, काही काळ विश्रांतीसाठी ते झाडाखाली आले असता त्यांना झाडावर आठ ते दहा फुट लांबीचा अजगर दिसून आला. अजगर दिसताच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती वन विभागाला दिली असता वन परिक्षेत्र ए अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन्य प्राणी रेस्क्यूपथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. इंडियन रॉक पायथन जातीच्या सापाला सर्प मित्राच्या सहाय्याने रेस्क्यु करून व्यवस्थित जंगलात सोडले. वनपाल ए. एस. घुगे, सर्पमित्र स्वप्नील सुरवाडे, अमोल सोनोने, संजय बंब यांच्या मदतीने अजगराला पकडून जंगलामध्ये सोडुन दिले.