थकीत करापोटी वीज कंपनीच्या कार्यालयाला सिल मनपाची कारवाई
By admin | Published: July 2, 2014 08:30 PM2014-07-02T20:30:20+5:302014-07-03T20:30:36+5:30
थकीत करापोटी वीज कंपनीच्या कार्यालयाला सिल लावण्यात आले.
Next
अकोला : थकीत करापोटी केडिया प्लॉटस्थित मेघदूत अपार्टमेंटमधील वीज कंपनीच्या कार्यालयाला सिल लावण्यात आले. ही कारवाई मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाने केली.
मालमत्ताधारक जमनलाल सोनीतर्फे भाडेकरी अरुण गोलाईत यांच्याकडे सन २००२-०३ ते २०१४ पर्यंतचा १ लक्ष ७ हजार रुपये मालमत्ता कर थकीत होता. यासंदर्भात गोलाईत यांना वारंवार सूचना करण्यात आल्या; परंतु कराचा भरणा न केल्याने अखेर बुधवारी वीज कंपनीच्या कार्यालयाला सिल लावण्यात आले.