मोर्णाकाठच्या नागरी वसाहतींना सावधानतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:16 PM2018-08-18T13:16:06+5:302018-08-18T13:18:35+5:30
मोर्णा नदीकाठच्या नागरी वसाहतींना सावध राहण्याचा इशारा महापालिका प्रशानसाने दिला आहे.
अकोला: संततधार पावसामुळे अकोल्यातील मोर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोरआगामी दोन दिवसात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे मोर्णा नदीकाठच्या नागरी वसाहतींना सावध राहण्याचा इशारा महापालिका प्रशानसाने दिला आहे.
मोर्णा नदीने अकोला शहराला दोन भागात विभागले असून, नदीकाठावर दोन्ही बाजूंनी वसाहती वसल्या आहे. पाण्याची पातळी थोडी जरी वाढली तरी या वसाहतींमध्ये पाणी शिरते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गुरुवारी उत्तर रात्री महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील काही भागात पाणी शिरले. नागरिकांनी सतर्क राहावे म्हणून महापालिकेची चमू परिसरात लक्ष ठेवून आहे. दरम्यान, या प्रभागातील भाजपा नगरसेवक अजय शर्मा यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांशी संपर्क साधला. आयुक्तांच्या आदेशन्वये क्षेत्रीय अधिकारी डॉ. दीपाली भोसले, वासुदेव वाघाडकर, आरोग्य निरीक्षक यांनी तातडीने नदीकाठच्या खोलेश्वर भागात भेट देऊन घटनेची पाहणी केली. नदीकाठच्या लोकांनी तात्पुरता आपले बिºहाड हलवावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नदी काठी राहणाऱ्यांची तात्पुरता व्यवस्था महापालिका शाळा क्रमांक १ आणि २ मध्ये करण्यात आली आहे. हरिहरपेठमधील नागरी वसाहतीत राहणाºयांची व्यवस्थादेखील महापालिकेने केली आहे. २० आॅगस्टपर्यंत पाऊस पाण्याची स्थिती अशीच राहणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.