सावधान....अकोल्यातील महिलांमध्ये वाढतोय ॲनिमिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 10:56 AM2020-12-28T10:56:55+5:302020-12-28T11:00:02+5:30

Anemia is increasing among women in Akola अकोला जिल्ह्यातही पाच वर्षांत या आजाराने ग्रस्त महिलांमध्ये ७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Caution .... Anemia is increasing among women in Akola! | सावधान....अकोल्यातील महिलांमध्ये वाढतोय ॲनिमिया!

सावधान....अकोल्यातील महिलांमध्ये वाढतोय ॲनिमिया!

Next
ठळक मुद्देविदर्भात सर्वाधिक ६६.२ टक्के रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळले आहेत.१५ ते ४९ वर्ष वयोगटातील ५४.२ टक्के महिलांना ॲनिमियाची समस्या आहे. मागील पाच वर्षांत हे प्रमाण ६.२ टक्क्यांनी वाढले आहे.

अकोला : मागील पाच वर्षांत महिलांमधील विविध आजारांमध्ये वाढ झाली असून, यामध्ये ॲनिमियाने ग्रस्त महिलांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, राज्यातील १५ ते ४९ वर्ष वयोगटातील ५४.२ टक्के महिला ॲनिमियाग्रस्त असून, मागील पाच वर्षांत हे प्रमाण ६.२ टक्क्यांनी वाढले आहे. अकोला जिल्ह्यातही पाच वर्षांत या आजाराने ग्रस्त महिलांमध्ये ७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विदर्भात सर्वाधिक ६६.२ टक्के रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळले आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, मागील पाच वर्षांत ॲनिमियाग्रस्त महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. १५ ते ४९ वर्ष वयोगटातील ५४.२ टक्के महिलांना ॲनिमियाची समस्या आहे. हेच प्रमाण २०१६ मध्ये ४८ टक्के होते. तसेच १५ ते १९ वर्ष वयोगटात हे प्रमाण सध्या ५७.२ टक्के असून, पाच वर्षांपूर्वी ४९.७ टक्के होते. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील महिला या आजाराने सर्वाधिक ग्रस्त असल्याचे सर्वेक्षणाच्या अहवालावरून समोर आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात १५ ते ४९ वर्ष वयोगटातील ६६.२ टक्के महिलांना, तर १५ ते १९ वर्ष वयोगटात ७६.३ टक्के मुलींना ॲनिमियाची समस्या आहे.

 

अशी आहे विदर्भातील स्थिती

जिल्हा - वयोगटातील रुग्ण (टक्केवारीत)

             - १५ ते ४९ वर्ष - १५ ते १९ वर्ष

अकोला - ५२.६ - ६०.३

अमरावती - ५३.४ - ६४.८

बुलडाणा - ५७.८ - ६६.८

भंडारा - ६५.३ - ६६.१

चंद्रपूर - ५५.५ - ६१.७

गडचिरोली - ६६.२ - ६७.३

गोंदिया - ६०.४ - ६५.२

नागपूर - ५३.६ - ५७.९

वर्धा - ६०.०० - ६३.५

वाशिम - ५६.४ - ५३.९

यवतमाळ - ५६.४ - ६४.१

 

ॲनिमिया का होतो?

मासिक पाळीतील रक्तस्राव, मूळव्याध, रक्तस्राव वाढणारे आजार

आजार अंगावर काढणे

आहारात लोह व प्रथिनांचे प्रमाण कमी

सकस आहाराचे कमी प्रमाण

 

अ‍ॅनिमिया हा स्रियांमध्ये आढळणारा नेहमीचा आजार आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणे आहेत. विशेषत: गर्भवतींनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. योग्य काळजी घेतल्यास अ‍ॅनिमियापासून मुक्ती मिळवणे शक्य आहे.

- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्री रुग्णालय, अकोला

Web Title: Caution .... Anemia is increasing among women in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.