सीबीएसई दहावीच्या निकालाचा टक्का वाढला, प्रभात किड्सचा तन्मय हनवंत जिल्ह्यातून अव्वल, अद्धैत जोशी, भक्ती शर्मा द्वितीय
By नितिन गव्हाळे | Published: May 13, 2024 10:55 PM2024-05-13T22:55:14+5:302024-05-13T22:55:47+5:30
परीक्षेत प्रभात किड्स स्कूलचा तन्मय हनवंते याने ९९.२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचे सहकारी अव्दैत जोशी व भक्ती शर्मा यांनी ९९ टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
अकोला: सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल सोमवार १३ मे रोजी जाहिर झाला असून, यंदाच्या सीबीएसई निकालामध्ये अकोला जिल्ह्याने चांगली भरारी घेतली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकालाचा घवघवीत टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. परीक्षेत प्रभात किड्स स्कूलचा तन्मय हनवंते याने ९९.२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचे सहकारी अव्दैत जोशी व भक्ती शर्मा यांनी ९९ टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
‘प्रभात’च्या ९० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर ६१ विद्यार्थ्यांना विविध विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून संस्कृत विषयात एकुण ४४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. वैभव अंबारखाने (९८.८), अर्थव निमकंडे (९८.४), सारा चौधरी (९८.२०), पार्थ राठोड (९८.२०), समृध्दी खांदेल (९८), पूनम पल्हाडे (९८), मयंक भोपाळे (९७.८), अर्णव कावरे (९७.८), आशी गोयनका (९७.८), केशव कोठारी (९७.६), दक्ष नेभनानी (९७.६०),यश राठोड (९७.६०), चाण्यक्य झापे (९७.४), जीत झांबड (९७), आर्या मानकर (९६.८), समीक्षा निचळ (९६.८), शांभवी टापरे (९६.८), साई उगले (९६.८), शशांक राऊत (९६.८), आर्या ढोले (९६.६), पूर्वा तितूर (९६.६), देवयानी जावळे (९६.४), र्धेर्य्या शर्मा (९६.४०), क्षीप्रा निलटकर (९६.२०), आयूष राठी (९६.२०), श्रेया वडतकर (९६.२०), श्रेयश पाटील (९६), श्रतुराज देशमुख (९६), श्रावणी लांडे (९५.६०), वल्लभ खेडकर (९५.६०), आर्या गावंडे (९५.४०), पृथा साठे (९५.४), पार्थ संघवी (९५), देवांशु काठकोरीया (९५), मनस्वी चतरकर (९५), शाश्वत रावणकर (९५), गार्गी भावसार (९५) आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. याशिवाय १९० विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रभातचे संचालक डॉ.गजानन नारे, संचालिका वंदना नारे, प्राचार्या वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांनी सत्कार केला.
पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून सात्विक गावंडे, भक्ती मानधने प्रथम
पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, सात्विक गावंडे, भक्ती मानधने या दोघांनी ९८. २ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पलक शाह हिने ९७ टक्के मिळून द्वितीय तर इशिता गुज्जर, देवेश इंगोले यांनी ९६.६ टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच ४५ विद्यार्थ्यांनी ९० टक्केहुन अधिक गुण मिळवले आहेत. ५५ विद्यार्थ्यांनी ८१ ते ९० टक्के गुण मिळवले आहेत. ध्रुव अग्रवाल आणि पलक शाह यांनी गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले तर सात्विक गावंडे, भक्ती मानधने आणि सायली इंगळे यांनी सोशल सायन्स विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. शाळेचे इशिता गुजर-९६.६, देवेश इंगोले-९६.६, अनय राठी-९६.४, समायरा हेडा-९६.२, अमोघ अर्धपूरकर-९५.८, जान्हवी धारीवाल-९५.८ राधिका अभिजित बांगर-९५.६ ऋचा मित्तल-९५.२, ध्रुव अग्रवाल-९५.२ आदी घवघवीत यश प्राप्त केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्राचार्या नीता तलरेजा यांनी सत्कार करून कौतुक केले.