विकास निधीतून शाळेत बसविले सीसी कॅमेरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:57+5:302021-04-17T04:17:57+5:30
पारस: ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात होणारा बदल, तसेच खासगी शिक्षण संस्थांचा पालकांना न परवडणारा खर्च यामुळे ग्रामीण भागातील पालक ...
पारस: ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात होणारा बदल, तसेच खासगी शिक्षण संस्थांचा पालकांना न परवडणारा खर्च यामुळे ग्रामीण भागातील पालक पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे वळले आहेत. सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा बोलबाला असून, त्यातुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा मागे राहणार नाहीत, यासाठी पारस येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे. पारस येथील जिल्हा परिषद सदस्या आम्रपाली अविनाश खंडारे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मुले, कन्या, जि. प. उर्दू शाळेमध्ये सीसी कॅमेरे बसविले आहेत. याचा फायदा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी निश्चितच होणार असल्याचे मत आम्रपाली अविनाश खंडारे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार, असेही सांगितले. (फोटो) वा.प्र. ८ बाय ८