नवीन किराणा बाजारात लागले सीसी कॅमेरे!
By admin | Published: June 24, 2017 05:54 AM2017-06-24T05:54:05+5:302017-06-24T05:54:05+5:30
पोलीस अधीक्षकांनी केले उद्घाटन; व्यापा-यांकडून ५१ हजार रुपयांची देणगी.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर रोडवरील नवीन किराणा बाजाराच्या आवारामध्ये अकोला होलसेल र्मचंंट को-ऑप. हाउसिंग कमशॉपिंग सोसायटीच्यावतीने निगराणीसाठी दहा सीसी कॅमेरे लावण्यात आले. शुक्रवारी दुपारी सीसी कॅमेरा नियंत्रण कक्षाचे फीत कापून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी उद्घाटन केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जुने शहरचे ठाणेदार गणेश अणे, कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, अकोला होलसेल र्मचंंट को-ऑप. हाउसिंग कमशॉपिंग सोसायटीचे सचिव कासमअली नानजीभाई, राजकुमार राजपाल, प्रकाश जैन आदी होते.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवीन किराणा बाजारामध्ये सीसी कॅमरे बसविणे गरजेचे असल्याचे ठाणेदार गणेश अणे यांनी व्यापार्यांना सांगितले होते. त्यानुसार व्यापार्यांनी एकत्र येऊन सीसी कॅमेरे बसविले. सीसी कॅमरे लावल्यामुळे पोलिसांना गुन्हय़ांचा तपास करणे सोईस्कर ठरते. सीसी कॅमेरे लावणे ही काळाची गरज असल्यामुळे शहरातील व्यापार्यांनीसुद्धा त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले.
अकोला होलसेल र्मचंंट को-ऑप. हाउसिंग कमशॉपिंग सोसायटीच्यावतीने जुना किराणा बाजार परिसरातसुद्धा सीसी कॅमेरे बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे ५१ हजार रुपये मदतनिधी सुपूर्द केला. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानप्रकाश खंडेलवाल यांनी केले.
यावेळी व्यापारी अशोक अग्रवाल, चंचल भाटी, तुषार भीमजियानी, दिनेश संघवी, अँड. एस.एस. ठाकूर, सलीम डोडिया, चंद्रलाल मनवानी, सुरेश मुलानी, सुरेश गुरबानी, गणेश गुरबानी, करीम डोडिया, आशिष कटारिया, मुश्ताकभाई, प्रशांत सेठ, प्रकाश जैन, बबन भट्टड, बरकत सुरानी, अशोक भिलकर, बंडू धरमकर, युनूस खान, चंदू ठाकूर आदी उपस्थित होते.