सीसीआयची कापूस खरेदी सप्टेंबरपर्यंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 11:14 AM2020-03-03T11:14:14+5:302020-03-03T11:14:20+5:30
भारतीय कापूस महामंडळाने यावर्षी येत्या सप्टेबर महिन्यापर्यंत कापूस खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यात कापसाची खरेदी जोरात सुरू असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी (सीसीआय) भारतीय कापूस महामंडळाने यावर्षी येत्या सप्टेबर महिन्यापर्यंत कापूस खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी सीसीआयचा उपअभिकर्ता महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व सीसीआयने राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या दोन्हीकडे कापूस विक्रीचा ओघ वाढला आहे. हमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. सीसीआयने यावर्षी विदर्भात ३८ खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. एफएक्यू दर्जाचा कापूस या केंद्रावर खरेदी केला जात आहे. कापसाचा ओेघ बघता यावर्षी वर्षभर कापूस खरेदी केली जाणार असून, शेतकऱ्यांनी घाई न करता कापूस निवांत विक्रीस आणावा म्हणजे कापूस खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही आणि सुरळीत खरेदी करता येईल, असे आवाहन सीसीआयने केले आहे.