नाताळ सण साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:26+5:302020-12-26T04:15:26+5:30

गेल्या नोव्हेंबर महिन्यापासूनच सर्वत्र नाताळ सणाची तयारी सुरू झाली. नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या खिश्चन धर्मीयांच्या गृहसणापासूनच खरेतर नाताळाची तयारी सुरू ...

Celebrate Christmas simply | नाताळ सण साधेपणाने साजरा

नाताळ सण साधेपणाने साजरा

googlenewsNext

गेल्या नोव्हेंबर महिन्यापासूनच सर्वत्र नाताळ सणाची तयारी सुरू झाली. नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या खिश्चन धर्मीयांच्या गृहसणापासूनच खरेतर नाताळाची तयारी सुरू होते. गृहसणाच्या वेळी सर्व खिश्चन कुटुंबे आपापल्या घरांची स्वच्छता करतात. त्या काळात सर्व खिश्चन बंधू भगिनी एकमेकांच्या घरी जाऊन प्रार्थना करतात आणि शुभेच्छा देतात. डिसेंबर महिना उजाडताच घरांना आणि चर्चेसना रंगरंगोटी देण्यास सुरुवात होते. पहिल्या पंधरवड्यातच नाताळासाठी कपड्यांची खरेदी, सणासाठी फराळाची तयारी सुरू होते. २० तारखेलाच सर्व घरे आणि चर्चेसना रोषणाई केली जाते. त्यानंतर सलग चार दिवस घरोघरी फिरून आबालवृद्ध खिस्तजन्माची गाणी म्हणतात. त्यामध्ये सांताक्लॉजचा वेश परिधान केलेला व्यक्ती सर्व लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. २४ डिसेंबरला रात्री १० ते १२ वाजेदरम्यान सर्व चर्चमधून प्रार्थना सभांचे आयोजन केले गेले. शुक्रवारी (दि.२५) सर्व चर्चमधून सकाळी ९ वाजता प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व चर्चमधील धर्मगुरूंनी खिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमधील वचनांच्या आधारे खिस्त जन्मावर संदेश दिला. प्रार्थनासभेनंतर सर्व खिस्ती बंधू-भगिनी यांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता सलग आठ दिवस सर्व चर्चमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अकोला शहरातील अलायन्स मिशन आणि इतर मिशनची असे एकूण ८ चर्चेस असून, नाताळानिमित्त त्या चर्चवर सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.

प्रभू येशूंच्या विचारांचे अनुकरण करा - रेव्ह. नीलेश अघमकर

ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेविअर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्ह. नीलेश अघमकर यांनी पवित्र बायबलमधील वचनांच्या आधारे नाताळाचा संदेश दिला. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता प्रभू येशू यांच्या प्रेम, त्याग आणि स्नेहाच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू येशू हे अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी या जगात आले, त्यांनी जगाला प्रेम, शांती, स्नेह आणि त्यागाची शिकवण दिली, त्याचेच अनुकरण करण्याची गरज असल्याचे रेव्ह. अघमकर म्हणाले.

Web Title: Celebrate Christmas simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.