अवैध धंदे बंद करण्याची शपथ देऊन संविधान दिन साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 05:07 AM2019-11-27T05:07:17+5:302019-11-27T05:07:32+5:30
मटका अड्डा चालविणाऱ्या माफियांना अवैध धंदे बंद करण्याची शपथ देऊन पोलिसांनी संविधान दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
- सचिन राऊत
अकोला : मटका अड्डा चालविणाऱ्या माफियांना अवैध धंदे बंद करण्याची शपथ देऊन पोलिसांनी संविधान दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. खदान परिसरात अब्दुल्ला हा मटका आणि जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यानंतर विशेष पथकाने छापेमारी करून हा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. तत्पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेनेही या ठिकाणी छापा टाकून १० ते १५ जुगारींना अटक केली होती. त्यानंतरही हा अवैध धंदा सुरूच असल्याच्या चर्चा झाल्याने त्या ठिकाणावर फिक्स पॉइंट लावण्यात आला. तसेच संविधान दिनी अब्दुल्ला यांना शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला तब्बल १ हजारावर नागरिकांची उपस्थिती होती.
वाल्याचा वाल्मीकी करण्याचा प्रयत्न
अब्दुल्ला खान आमीर खान यांनी अवैध धंदे बंद करण्याची शपथ घेतली. सुमारे १ हजारावर नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यापुढे सदर ठिकाणावर फिक्स पॉइंटही लावण्यात आला आहे.
- उत्तमराव जाधव,
ठाणेदार, खदान पोलीस स्टेशन