सण, उत्सव घरातच साजरे करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:15+5:302021-04-10T04:18:15+5:30
अकोला : कोरोना विषाणूच संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील सण व उत्सव घरातच साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ...
अकोला : कोरोना विषाणूच संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील सण व उत्सव घरातच साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी शांतता समितीच्या बैठकीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, तहसीलदार विजय लोखंडे तसेच धर्मगुरू, धार्मिक संस्थांचे प्रमुख आदी उपस्थित होते. आगामी काळात विविध धर्मीयांचे प्रमुख सण व उत्सव होणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करून, सण व उत्सव घरातच साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. कोरोना काळात मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून नागरिकांनी सण व उत्सव साजरे करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
.........................फोटो.........................