नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:07+5:302021-09-09T04:24:07+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापौर अर्चना मसने, पोलीस अधीक्षक ...

Celebrate Ganeshotsav by following the rules | नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा

Next

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापौर अर्चना मसने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपमहापौर राजेंद्र गिरी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष मोतिसिंग मोहता, सचिव तथा नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, तसेच विविध मंडळांचे पदधिकारी, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांनी गणेशोत्सवासंदर्भात शासनाच्या निर्देशांचे वाचन करून उपस्थितांना अवगत केले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गणेशोत्सव काळात जिल्ह्यात अंमलात असणाऱ्या पोलीस बंदोबस्त व कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. मंडळांचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच उत्सवकाळात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी सिद्धार्थ शर्मा व मोतिसिंग मोहता यांनीही मत मांडले. मंडळांच्या वतीने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या भागात आरटीपीसीआर चाचण्या करून घ्याव्या. गणेश स्थापना ते विसर्जन या कालावधीत होणारे गर्दीचे प्रसंग टाळून आपण आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करावे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याकरिता मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

Web Title: Celebrate Ganeshotsav by following the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.