साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा : अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:26 AM2021-09-10T04:26:09+5:302021-09-10T04:26:09+5:30
बुधवारी सायंकाळी पातूरच्या महात्मा फुले बचत भवनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत ...
बुधवारी सायंकाळी पातूरच्या महात्मा फुले बचत भवनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत म्हणाल्या, कोरोनासंदर्भात तिसरी लाट येऊ घातली आहे त्यासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियम, अटी, शर्तींचे पालन प्राधान्यक्रमाने गणेश मंडळांनी करावे. प्रामुख्याने गणेश मंडळांनी चार फुटांपेक्षा मोठी मूर्ती स्थापना करू नये, विसर्जन मिरवणूक काढू नये, ध्वनिक्षेपकाचा उपयोग केवळ आरतीसाठीच करावा, आरती करताना पाच-सहा पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊ नयेत. आरोग्यविषयक, शैक्षणिक उपक्रम राबवावेत.
प्रास्ताविक पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी केले. यावेळी मोहम्मद फय्याज, पत्रकार देवानंद गहिले, प्रदीप काळपांडे, गणपती मंडळाचे बालूभाऊ बगाडे, माजी नगराध्यक्ष इद्दुभाई पहेलवान, बळिराम खंडारे, आदी उपस्थित होते. संचालन पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी केले. आभार प्रदर्शन गंगाधर चौधरी यांनी केले.
फोटो:
090921\img_20210908_181217.jpg
गणशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा