भक्तिमय वातावरणात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:46+5:302021-09-09T04:24:46+5:30
पातूर : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात शासनाच्या निर्देशानुसार साधेपणाने साजरा करा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत ...
पातूर : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात शासनाच्या निर्देशानुसार साधेपणाने साजरा करा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले. बुधवारी सायंकाळी येथील महात्मा फुले बचत भवनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मोहम्मद फय्याज पत्रकार देवानंद गहिले, प्रदीप काळपांडे, गणपती मंडळाचे बालूभाऊ बगाळे, माजी नगराध्यक्ष इद्दुभाई पहेलवान, बळीराम खंडारे आदींनी माहिती दिली. शांतता समितीच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपविभागीय अधिकारी आव्हाडे, पोलीस निरीक्षक हरीश गवळी, पीएसआय गंगाधर चौधरी उपस्थित होते. पोलीस पाटील संघटनेच्यावतीने वनिता बोचरे, होमगार्ड समादेशक संगीता इंगळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालन पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी केले, तर आभार गंगाधर चौधरी यांनी मानले. बैठकीचे यशस्वी आयोजन मेजर भवाने, श्रीधर पाटील, सचिन पिंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केले.
080921\img_20210908_181217.jpg
अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे आवाहन