राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय दिन साजरा

By admin | Published: October 3, 2016 02:28 AM2016-10-03T02:28:43+5:302016-10-03T02:28:43+5:30

हृदयरोगापासून जीवनदान मिळालेल्या चिमुकल्यांचे कौतुक करण्यात आले.

Celebrate heart day under the National Child Health Program | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय दिन साजरा

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय दिन साजरा

Next

अकोला, दि. 0२- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनातील आर.बी.एस.के. पथकाने हृदय दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अंगणवाडी व शाळा तपासणीत वेगवेगळ्या प्रकारचे हृदय रोगाचे लहान रुग्ण आढळले. त्यांच्यावर आयकॉन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. उपसंचालक आरोग्य सेवा तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या प्रयत्नाने लहान पाल्यांच्या पालकांची मुंबई - पुण्याच्या कटकटीतून मुक्तता करून राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ४२१ मुलांच्या नोंदणीपैकी आतापर्यंंंत २८३ मुला-मुलींवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य उमटवले.यशस्वी शस्त्रक्रियेच्या प्रयत्नाला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या जिल्ह्याच्या १९ पथकाला दिले असून त्यांचे कार्य निरंतर सुरू राहण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करण्याचे आश्‍वासन डॉ. चव्हाण यांनी याप्रसंगी दिले.डॉ. चव्हाण यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. पुरी, मनपा आयुक् तांचे प्रतिनिधी डॉ. फारुक शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम.डी. राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सराटे, हुमणे उपस्थित होते.
या चांगल्या उपक्रमामुळे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य या पथकाने दाखवून दिले, असे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले. प्रस्तावना नंदकिशोर कांबळे, संचालन डॉ. अश्‍विन तिवारी, आभार प्रदर्शन डॉ. राम नागे यांनी केले, असे डॉ. मनीष मेन यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Celebrate heart day under the National Child Health Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.