प्रकाशवाट ग्रंथालयात महिला शिक्षण दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:37+5:302021-01-04T04:16:37+5:30
मूर्तिजापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे विचार ...
मूर्तिजापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे विचार मान्यवरांनी मूर्तिजापूर येथील प्रकाशवाट ग्रंथालयात रविवारी आयाेजित महिला शिक्षण कार्यक्रमात व्यक्त केले. क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.
विशाल वैद्य व मुरलीधर आगळे यांनी महात्मा फुले व सवित्रीबाई फुले यांची प्रतिमा ग्रंथालयास भेट दिली. प्रारंभी प्रकाशवाटच्या आधारस्तंभ शिक्षिका मनोरमा बांबल, जया टाले, प्रगती देवके, प्रा. फुटाणे व जोगळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पखाले यांची कन्या काळे यांचाही सत्कार केला. कार्यक्रमाला रामकृष्ण गावंडे, जितेंद्र हासानी, सुनील वानखडे, विलास वानखडे, विंचूरकर, ढाळे, केशवाणी, ऋषिकेश गावंडे यांच्यासह प्रकाशवाटचे सदस्य व विद्यार्थ्यांची उपस्थिती हाेती.