बार्शीटाकळी येथे जागतिक आरोग्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:04+5:302021-04-10T04:18:04+5:30
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या लोहकपुरे यांनी केले. गत वर्षभरापासून कोरोना विषाणूपासून जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शारीरिक क्षमता वाढविणे, ...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या लोहकपुरे यांनी केले. गत वर्षभरापासून कोरोना विषाणूपासून जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शारीरिक क्षमता वाढविणे, योग्य अनुकूल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, व्यसनांपासून दूर राहणे, ध्यान धारणा करणे, मास्क लावणे, योग्य अंतर राखणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, वारंवार हात धुणे, घराची व परिसराची स्वच्छता राखणे, आरोग्यवर्धक काढा घेणे, हळदीचे दूध घेणे, सौम्य व सात्विक आहार घेणे, आहारात हिरव्या पालेभाज्या व फळे यांचा समावेश करतानाच भाजीपाला निर्जंतुक करून वापरण्याची दक्षता घेणे आदींचे पालन करावे, असे प्राचार्य लोहकपुरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमात प्रा.डॉ.पंडित, प्रा घुगे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉक्टर लोहकपुरे यांनी केले, तर आभार डॉ. पंडित यांनी मानले. (फोटो)