जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 03:31 PM2020-02-02T15:31:22+5:302020-02-02T15:31:41+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन शनिवारी साजरा करण्यात आला.
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन शनिवारी साजरा करण्यात आला.
यामध्ये क्रीडा भारती, जिल्हा नेहरू युवा केंद्र, अजिंक्य फिटनेस पार्क, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, योग सांस्कृतिक केंद्र, पतंजली योग समिती, पूज्य सिंधी जनरल पंचायत आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, क्रीडा भारती प्रमुख, डॉ. पराग टापरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त प्राचार्य शत्रुघ्न बिडकर, सुहास काटे, कन्हैयालाल रंगवाणी, हरीश पारवाणी, बुढण गाडेकर, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, श्रीकांत देशमुख, प्रशांत पाटील यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन रश्मी जोशी यांनी केले. आभार क्रीडा अधिकारी दिनकर उजळे यांनी मानले. प्रभारी क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीश भट्ट, लक्ष्मीशंकर यादव, क्रीडा अधिकारी चारू दत्त नाकट, संयोजक मनीषा ठाकरे, महेश पवार, प्रशांत खापरकर, निशांत वानखडे, अजिंक्य घेवडे, अकोला हॉकी सचिव धीरज चव्हाण, गजानन चाटसे, अशोक वाढोरे, गंगाधर झरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.