पातूर येथे जागतिक वन्यजीव दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:17+5:302021-03-05T04:19:17+5:30
शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना वन्यजीव दिसल्यावर काय उपाय योजना करावी. याबाबत माहिती देण्यात आली कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने यांनी ...
शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना वन्यजीव दिसल्यावर काय उपाय योजना करावी. याबाबत माहिती देण्यात आली कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने यांनी मानव-वन्यजीव संघर्ष कसा कमी करता येईल या विषयावर मार्गदर्शन केले. पातुर आलेगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या जंगला नजीकच्या गावांमध्ये फलकांच्या स्वरूपात ही माहिती गावकऱ्यांकरिता प्रसिद्ध करण्यात येईल. असे धीरज मदने यांनी सांगितले.पोम्प्लेट जनजागृती फलकाची संकल्पना व मांडणी निसर्ग कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष अमोल सावंत यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग कट्ट्याचे सदस्य डॉ. मिलिंद शिरभाते यांनी केले. राऊंड ऑफिसर प्रणाली धर्माळे, महात्मा फुले महाविद्यालय येथील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अमृता शिरभाते, प्रा. रोशनी लोमटे, वनरक्षक अविनाश घुगे, महेश वाणी, वनरक्षक संजय पाठक व वन अधिकारी उपस्थित होते.
फोटो: