आदिशक्तीचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:36 AM2017-09-21T01:36:49+5:302017-09-21T01:37:18+5:30
अकोला : शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात गुरुवारपासून होत आहे. आता नऊ दिवस शहरात रासगरब्यासह विविध कार्यक्रमांची धूम राहणार आहे. घरा-घरात विधिवत घटस् थापना होईल. शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी नवदुर्गोत्सव मंडळांद्वारे नवदुर्गेची प्रतिष्ठापना केली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क

आदिशक्तीची उपसाना नवदुर्गोत्सवादरम्यान केली जाते. शहरात नवदुर्गोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हाभरातील देवीची शक्तीपीठे भक्तांच्या गर्दीने फुलणार आहेत.
मंदिरात उद्यापासून भजन, कीर्तन, प्रवचनासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. मंदिरात अष्टमीला होमहवन केले जाईल. तर महानवमीला होमहवनानेच नवरात्रौत्सवाचे समापन होईल. नवमीनंतर विविध सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळांद्वारे महाप्रसादाचे आयोजन केले जाईल. या उ त्सवाच्या निमित्ताने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.
सूर्यास्तापर्यंत मुहूर्त
सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. यावेळेत कधीही देवीचे आवाहन केले जाऊ शकते. घटस्थापनेसाठी बाजारात मातीच्या घागरींसह विविध साहित्य विक्रीसाठी उ पलब्ध आहे. विविध रंगबिरंगी फुलांनी बाजारपेठ सजली आहे. घरोघरी नऊ दिवस कन्यापूजनाला उधाण येईल व सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असेल.