पारस येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:07+5:302021-05-16T04:18:07+5:30
------------------------------------ पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचारी लसीपासून वंचित! संबंधित विभागांना पत्र देऊनही दखल नाही कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप पारस : ...
------------------------------------
पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचारी लसीपासून वंचित!
संबंधित विभागांना पत्र देऊनही दखल नाही कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप
पारस : येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘फ्रन्टलाइन वर्कर’ म्हणून मान्यता दिल्यानंतरही हे कर्मचारी लसींपासून वंचित आहेत. प्रकल्पातील एकूण आठ संघटनांनी मुख्य अभियंत्यांमार्फत कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करूनही अद्याप वीज निर्मिती कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून दिली नसल्याने कर्मचाऱ्यांमधूून रोष व्यक्त होत आहे.
पारस प्रकल्पात एकूण ८० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आहे. जीव धोक्यात टाकून सेवा देत असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी कोविड-१९ लसीची व्यवस्था केली नसल्याने कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केल्या जात आहे. संबंधित वीजनिर्मिती प्रकल्पातील एकूण आठ संघटनांच्या प्रतिनिधींनी याबाबत निषेध व्यक्त केला आहे. लसीकरणाच्या मागणीबाबत पारस वीजनिर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंत्यांना सब ऑर्डिनेट इंजिनिअरिंग असोसिएशन, ग्रॅज्युएट इंजीनिअरिंग असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य विद्युत तांत्रिक कामगार संघटना, मी.रा.रा.वि.का. फेडरेशन इंटक, कॉलिफ्लॉवर महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार महासंघ, मी.रा.मा.वि.क. संघटना, असोसिएशन ऑफ केमिस्ट इत्यादी संघटनांनी संचालन महानिर्मिती मुंबई, औद्योगिक संबंध अधिकारी मुंबई, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बाळापूर यांना एका पत्राद्वारे माहिती देऊन निषेध व्यक्त केला आहे. वीजनिर्मिती प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी संघटनांकडून होत आहे.