प्रकट दिन उत्सवाची सांगता
By admin | Published: March 3, 2016 02:03 AM2016-03-03T02:03:30+5:302016-03-03T02:03:30+5:30
संत श्री गजानन महाराजांच्या १३८ व्या प्रकट दिन उत्सवाची बुधवारी सांगता झाली.
शेगाव (जि. बुलडाणा) : संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने संत श्री गजानन महाराजांच्या १३८ व्या प्रकट दिन उत्सवाची बुधवारी सांगता झाली.
संस्थानच्या प्रांगणामध्ये हभप जगन्नाथ म्हस्के मुंबई यांचे सकाळी १0 वाजता काल्याचे कीर्तन झाले. या कीर्तनानंतर प्रकट दिन उत्सवासाठी राज्यभरातून आलेल्या १६५६ भजनी दिंड्यांना संस्थानच्या वतीने यथोचित निरोप देण्यात आला. तर संस्थानच्या नियमांची पूर्तता करणार्या दिंड्यांना भजनी साहित्यही वाटप करण्यात आले. ११ वाजता श्रींची आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेऊन अनेक भाविकांनी परतीचा मार्ग धरला. या उत्सवादरम्यान शेगाव शहरातील अनेक सामाजिक संस्था, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी भक्तांच्या सोयीसाठी विविध सेवा दिल्या होत्या. तर पोलिसांच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाने विशेष गाड्यांची सुद्धा व्यवस्था केली होती.