सीताबाई महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:27 AM2021-02-23T04:27:32+5:302021-02-23T04:27:32+5:30
सर्वप्रथम समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिनकर उंबरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, तर राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. रतन ...
सर्वप्रथम समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिनकर उंबरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, तर राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. रतन राठोड व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई यांनी हारार्पण केले. यानंतर सर्व प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. भारती पटनायक, डॉ. अनिरुद्ध खरे, प्रा. भास्कर धारणे, डॉ. सुरेशकुमार केसवानी, डॉ. अशोक सोनोने, नीळकंठ इंगळे, प्रा. सुभाष दामोदर, डॉ.ज्ञानशील खंडेराव, डॉ. कैलास वानखडे, डॉ. स्नेहल शेंबेकर, डॉ. बाळासाहेब जोगदंड, डॉ. हरिचंद नरेटी, डॉ. सुनील गायगोल, डॉ. कौमुदी बर्डे, डॉ. गोविंद एललकार, प्रा. नाना भडके, प्रा. कुलकर्णी, प्रा. वेदांजली काळे, प्रा. सुनीता बन्ने, प्रा. सुनीता डाबेराव, प्रा. मार्कंडे, प्रा. प्रशांत ठाकरे, प्रा. अमोल गावंडे, डॉ. अजय सोळंके, डॉ. नीरज लांडे, प्रा. मनीषा पेठे, नाना खोले, महादेव सोळंके, रंजना ताले, दिनेश भारुका, भारत लोहकपुरे, जामनिक, कैलास अमृतकर, राजेश सोनोने, सोहन नावकार, प्रशांत दिनोदे, महेंद्र हिवराळे, विवेक वाडेवाले, गजानन कळंबे, प्रीती शर्मा, आश्विन राकेश, शुभम पौळ, किरण पाटेखेडे, नकुल गौड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.