अकोटमध्ये कावड यात्रेचा उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 03:21 PM2017-08-14T15:21:34+5:302017-08-14T15:21:41+5:30
अकोट येथे श्रावणातील चौथ्या सोमवारी (14 ऑगस्ट) कावड यात्रा उत्सव मिरवणूक काढण्यात आली आहे. स्थानिक तपेश्वरी व नंदीपेठमधील महादेवाला जलाभिषेक करण्याकरीता कावडधारी शिवभक्तांनी पूर्णानदीतून पाणी आणले होते.
विजय शिंदे/अकोट, दि. 14 - अकोट येथे श्रावणातील चौथ्या सोमवारी (14 ऑगस्ट) कावड यात्रा उत्सव मिरवणूक काढण्यात आली आहे. स्थानिक तपेश्वरी व नंदीपेठमधील महादेवाला जलाभिषेक करण्याकरीता कावडधारी शिवभक्तांनी पूर्णानदीतून पाणी आणले होते.
या कावड पालखी मिरवणुकीत 23 मंडळं सहभागी झाली होती. देशभक्तीसह विविध महादेवाची रूपे व देखावे लक्षवेधी ठरली. या उत्सवामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण आहे. मिरवणूक भार्गावर विविध स्वयंसेवी संस्थानी फराळ, पाणी, चहाची व्यवस्था केली होती.
ठिकठिकाणी पालखीची पूजा सुरू होती. यावेळी मिरवणूक व दर्शनाकरीता प्रथमच महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. कावड स्पर्धाचे परिक्षण महेश गणगणे यांचे निवासस्थान समोर करण्यात येत आहे. मिरवणुकीकरीता अकोट शहर पोलीस निरिक्षक गजानन शेळके हे स्वतः मिरवणुकीत सहभागी होत चोख बंदोबस्त ठेऊन आहेत.