सेठ बन्सीधर हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:15 AM2021-01-09T04:15:53+5:302021-01-09T04:15:53+5:30
तेल्हारा : सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या जयंतीनिमित्त सेठ बन्सीधर हायस्कूल येथे स्नेहसंमेलन शुक्रवारी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे ...
तेल्हारा : सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या जयंतीनिमित्त सेठ बन्सीधर हायस्कूल येथे स्नेहसंमेलन शुक्रवारी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष बेनिप्रसाद झुनझुनवाला हाेते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव जोशी, व्यवस्थापक गोपालदास मल्ल, कोषाध्यक्ष विठ्ठलराव खारोडे, संचालक डॉ. विक्रम जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्रकुमार देशमुख यांनी केले. कोषाध्यक्ष विठ्ठलराव खारोडे यांनी कोरोनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ विक्रम जोशी यांनी मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष बेनिप्रसाद झुनझुनवाला यांनी संस्थेची प्रगती व उन्नती करण्यामागे तसेच शाळेमध्ये सुविधा उपलब्ध करण्यामागे केवळ दर्जेदार शिक्षण हाच एकमेव उद्देश असल्याचे सांगून संस्थेचा लेखाजोखा सादर केला. यावेळी संस्थेच्या संचालिका अश्विनी खारोडे ,स्वामी विवेकानंद ज्ञानपीठच्या प्राचार्य रंजना भागवत, मुख्याध्यापक प्राथमिकचे आशिष अग्रवाल यांच्यासह शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन मुकुंद सोनिकर, उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा यांनी केले. दि. ११ जानेवारी रोजी हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, असेही यावेळी कळविण्यात आले आहे.