सेल्युलर मोबाइल कॉल होताहेत अचानक ‘ड्रॉप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:32 PM2019-01-05T13:32:22+5:302019-01-05T13:33:09+5:30
अकोला : गत चार दिवसांपासून सेल्युलर मोबाइल कॉल अचानक ड्रॉप होत असल्यामुळे राज्यभरातील ग्राहक सध्या त्रस्त आहेत. याबाबत मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला विचारणा केली असता, नाममात्र सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जातत्यातूनच अचानक कॉल ड्रॉप होण्याच्या घटना वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
- संजय खांडेकर

कधीकाळी मोबाइलवरील व्हॉइस कॉलिंगची सेवा ही केवळ रेडिओ फ्रीक्व्हेन्सीवर अवलंबून असायची. वायरलेसच्या या सेवेदरम्यान आॅप्टिकल्स फायबर केबलची सेवा सुरू झाली. या सेवेसोबतच जीओने इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डेटा कॉलिंगची नवीन पद्धत सेवेत आणली. अत्यंत स्वस्त दरात डेटा कॉलिंगची सेवा दिल्याने अनेक सेल्युलर मोबाइल कंपन्यांचे दिवाळे निघाले. जीओने या सेवेसोबत स्वत:चे स्वस्त उपकरणही ग्राहकांना उपलब्ध करून दिले. ग्राहक सेवेच्या या जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी इतर कंपन्यांनीदेखील इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डेटा कॉलिंगची सेवा सुरू केली. जीओप्रमाणे स्वस्त दरात सेवा दिली गेली. मात्र अनेक नामांकित कंपन्यांना अजूनही नवीन तंत्रज्ञानाची सांगड जुळविता आलेली नाही. कधी कॉल लागत नाही, तर कधी कॉल ड्रॉप होतो. एकीकडे व्हॉट्स अॅप कॉलिंग होते, तर डेटा कॉलिंग बंद पडते. मध्येच आवाज तुटतो. वारंवार कॉल करूनही प्रतिसाद मिळत नाही. या समस्या गेल्या चार दिवसांपासून मोबाइल वापरणाºयांना भेडसावित आहेत.
आॅप्टिकल फायबर केबलच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने चार दिवसांपासून कनेक्टिव्हिटीच्या समस्या आहेत. बीएसएनएलची व्हॉइस कॉलिंग सेवा आणि इंटरनेट सेवा दोन्ही वेगवेगळ्या आहेत. डेटा कॉलिंग पद्धती आमच्याकडे नाही. चार दिवसांपासून ग्राहक त्रस्त आहेत, लवकर ही समस्या दूर होईल,
-विजय पागृत, सहायक महाव्यवस्थापक, बीएसएनएलअकोला.