सिमेंट रस्त्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:42+5:302021-02-13T04:18:42+5:30

रुग्णांच्या देयकांचे ‘ऑडिट’ रखडले अकाेला : काेराेना विषाणूच्या कालावधीत शहरातील खासगी काेविड रुग्णालयांनी रुग्णांना अव्वाच्या सव्वा दराने देयके आकारली. ...

Cement road work is slow | सिमेंट रस्त्याचे काम संथगतीने

सिमेंट रस्त्याचे काम संथगतीने

Next

रुग्णांच्या देयकांचे ‘ऑडिट’ रखडले

अकाेला : काेराेना विषाणूच्या कालावधीत शहरातील खासगी काेविड रुग्णालयांनी रुग्णांना अव्वाच्या सव्वा दराने देयके आकारली. याबाबीचा उहापाेह झाल्यानंतर खासगी रुग्णालयांच्या देयकांचे ‘ऑडिट’करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला हाेता. ही प्रक्रिया रखडल्याचे दिसत आहे. जिल्हाप्रशासनाने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी हाेत आहे.

काेराेनाचा प्रादूर्भाव वाढला !

अकाेला : मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. या कालावधीत काेराेना विषाणूचा प्रसार अधिक गतीने झाल्याचे चित्र आहे. नागरिक घराबाहेर फिरताना ताेंडाला रुमाल किंवा मास्क बांधत नसल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हाेत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

किल्ल्याची दुरवस्था; मनपाचे दुर्लक्ष

अकाेला : शहरात इतिहासाची एकमेव साक्ष देणाऱ्या जुने शहरातील असदगड किल्ल्याची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गतवर्षी किल्ल्याची पडझड थांबावी या उद्देशातून संरक्षक भिंत उभारण्यात आली हाेती. किल्ल्याच्या ठिकाणी साैंदर्यीकरणाला माेठा वाव आहे.

गांधी चाैकाला अतिक्रमणाचा विळखा

अकाेला : शहरातील प्रमुख बाजारपेठ वसलेल्या गांधी चाैकाला लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. रस्त्याच्याकडेला हातगाड्यांवर रेडिमेड ड्रेस, प्लॅस्टिकची खेळणी व किरकाेळ साहित्याची विक्री केली जात असून, अतिक्रमणाची समस्या दूर करणाऱ्या मनपाच्या अतिक्रमण विभागाने झाेपेचे साेंग घेतले आहे.

ऑटोचालकांची मनमानी;पोलिस हतबल

अकोला : वाहतूक शाखा पाेलिसांच्या डाेळ्यादेखत गांधीरोड, सिटी काेतवाली चाैक तसेच खुले नाट्यगृह चाैकात ऑटाेचालकांच्या मनमानीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. थांबा नसताना चौकात ऑटाे उभे केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या वाहतूक पोलीस दूर करतील का? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

पंचायत समितीसमाेर खड्डे

अकाेला : शहरातील पंचायत समिती कार्यालयासमाेरील मुख्य रस्त्याचे निर्माण कार्य करण्यात आले. परंतु पंचायत समिती कार्यालय ते मनपाच्या वाणिज्य संकुलापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदरचे खड्डे मनपाने तातडीने बुजविण्याची गरज आहे.

पार्किंगची कोंडी कायम

अकोला : शहरात पार्किंगच्या जागेवर उभारलेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकरांची कुचंबना हाेत आहे. मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी ही समस्या दूर करण्याची गरज आहे. नागरिक त्यांची वाहने रस्त्यावर उभी ठेवत असल्याने वाहतुकीची काेंडी हाेत आहे. वाहतूक शाखा पाेलिसांच्या टाेइंग पथकाच्या कारवाईमुळे वाहनधारक वैतागले आहे.

'दररोज पाणीपुरवठा करावा' !

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरणप्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे. परंतु दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने अकाेलेकरांमधये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग-१मधील नायगाव येथील रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Cement road work is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.