कापूस पिकासाठीचे सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:19 AM2021-07-27T04:19:36+5:302021-07-27T04:19:36+5:30
कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात हा करार झाला. यावेळी कपाशी हे मुख्य पीक असलेल्या विदर्भातील शेतकरी बांधवांना काळानुरूप शाश्वत ...
कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात हा करार झाला. यावेळी कपाशी हे मुख्य पीक असलेल्या विदर्भातील शेतकरी बांधवांना काळानुरूप शाश्वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत होणे गरजेचे आहे. याकरिता समयोचित प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाचे आयोजन अधिक लाभदायी ठरेल, असा आत्मविश्वास कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तर या करारांतर्गत चांगल्या प्रतीचा कापूस उत्पादन करून शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करता येईल, जेणेकरून त्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होईल, असे आशादायी वक्तव्य विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य विदर्भ विभागाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी केले.
याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता (कृषी) डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक श्री. मनमोठे, मे. इंडो काऊंट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई कंपनीचे शाश्वत शेतीचे व्यवस्थापक प्रशांत टेकाडे, कुलगुरु यांचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय देशमुख, मध्य विदर्भाचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, उपसंचालक बियाणे डॉ. वर्षा टापरे तथा कापूस संशोधन केंद्राचे प्रतिनिधी प्रकल्पातील सहसंशोधक डॉ. ए. एस. लाटकर, डॉ. सुरेंद्र देशमुख, तांत्रिक अधिकारी कीटक शास्त्रज्ञ डॉ. निरज सातपुते प्रामुख्याने उपस्थित होते. सहयोगी संशोधन संचालक डॉ. डी. टी. देशमुख यांनी आभार मानले.