केंद्र सरकार नाट्य, लोककलावंतांच्या शोधात!

By admin | Published: February 1, 2016 02:11 AM2016-02-01T02:11:57+5:302016-02-01T02:11:57+5:30

कलावंतांना मिळणार नवृत्ती वेतन, कोश तयार करणार.

Central government drama, search for folk artists! | केंद्र सरकार नाट्य, लोककलावंतांच्या शोधात!

केंद्र सरकार नाट्य, लोककलावंतांच्या शोधात!

Next

विवेक चांदूरकर/वाशिम: केंद्र सरकारच्या भारतीय लोककला महासंघाच्या वतीने नाट्य कलावंतांना नवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील तसेच गावागावांतील नाट्य, लोककलावंतांसह विविध कला सादर करणार्‍या मंडळांचा एक कोश तयार करण्यात येत आहे. यासाठी सध्या महाराष्ट्र लोककला संघाचे पदाधिकारी शहरी भागासह ग्रामीण भागात कलावंतांचा शोध घेत आहेत. देशातील विविध भागात तसेच विविध जातींमध्ये अनेक लोककला रुजल्या आहेत. यामध्ये चंद्रपूर भागातील झाडीमंडळाची नाटके, भारूड, मेळघाटमधील आदिवासींची लोकगीते व नृत्य, फगवा, वासुदेव, भजन, कीर्तन, गोंधळ, पोवाडे यांचा समावेश आहे. या सर्व लोककला आता लुप्त होण्याच्या मार्गावर असून, अनेक समाजातील लोकांनीही आता पारंपरिक कला जोपासणे बंद केले आहे. त्यामुळे या सर्व कलांचे संवर्धन व्हावे, याकरिता शासनाने कोश तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या भारतीय लोककला महासंघाच्या वतीने हा कोश तयार करणार आहे. याकरिता राज्यातील महाराष्ट्र लोककला संघाला ही जबाबदारी दिली आहे. या कोशासाठी माहिती संकलित करण्यात येत आहे. यामध्ये नाट्यकलावंत, लोककलावंत यांची माहिती असणार आहे. या माहितीमध्ये त्यांची छायाचित्रे, किती वर्षांपासून ते ही कला सादर करीत आहेत, किती पिढय़ांपासून ही कला जोपासत आहेत. कोणत्या गावातील असून, त्या गावातील किती लोक ही कला जोपासतात, केव्हापासून कला जोपासणे बंद झाले, याची सर्व माहिती या कोशामध्ये संग्रहित होणार आहे. यासोबतच अनेक गावांमध्ये साहित्य मंडळे, भजन मंडळ, कीर्तन मंडळ कार्यरत असते. अशा मंडळांची व त्यामधील सदस्यांचीही माहिती यामध्ये असणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र लोककला संघाचे पदाधिकारी गावागावांमध्ये जाऊन कलावंतांशी संवाद साधत असून, त्यांची माहिती घेत आहेत. १६ फेब्रुवारीपर्यंत संकलित करणार माहिती महाराष्ट्र लोककला संघाच्या वतीने १६ फेब्रुवारीपर्यंत माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामध्ये नाट्य कलावंत, लोककलावंतांसह समूह मंडळांचाही समावेश आहे. त्यांना नवृत्ती वेतनही देण्यात येणार आहे. त्यामुळे कलावंतांनीही संघाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Central government drama, search for folk artists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.