मध्य रेल्वेने केली ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 10:37 AM2021-08-04T10:37:24+5:302021-08-04T10:37:31+5:30
Central Railway handles 5.33 million tonnes of goods : बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) च्या पुढाकारामुळे मालवाहतुकीचा टक्का वाढला आहे.
अकोला : मध्य रेल्वेच्या माल वाहतुकीस चांगलाच प्रतिसाद मिळत असून, जुलै २०२१ मध्ये ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४.२५ दशलक्ष टन होती. जुलै २०२१ मधील मालवाहतूक लोडिंगमध्ये जुलै २०२० च्या तुलनेत २५.४१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या झोनल आणि विभागीय स्तरावर स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) च्या पुढाकारामुळे मालवाहतुकीचा टक्का वाढला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जुलै २०२१ महिन्यात २.८७ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. मुंबई विभागाने १.३७ दशलक्ष टन, सोलापूर विभागाने ०.५४ दशलक्ष टन, भुसावळ विभागाने ०.४४ दशलक्ष टन तर पुणे विभागाने ०.११ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे.