मध्य रेल्वेने १,४१५ रॅक्समध्ये केली ७०,३७४ वॅगन माल वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:38 PM2020-04-24T17:38:05+5:302020-04-24T17:38:11+5:30

न्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे.

Central Railway transports 70,374 wagons in 1,415 racks | मध्य रेल्वेने १,४१५ रॅक्समध्ये केली ७०,३७४ वॅगन माल वाहतूक

मध्य रेल्वेने १,४१५ रॅक्समध्ये केली ७०,३७४ वॅगन माल वाहतूक

Next

अकोला : मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज विविध टर्मिनसवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळले जात आहेत. ज्यात अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे. चोवीस तासांच्या तत्त्वावर सतत कार्यरत असलेल्या गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचाº­यांनी २३ मार्च २०२० ते २२ एप्रिल २०२० पर्यंत १,४१५ रॅकमध्ये आवश्यक वस्तूंच्या ७०,३७४ वॅगन लोड केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात २५२ वॅगनमध्ये धान्य, ४८४ वॅगनमध्ये साखर, ३४,४९७ वॅगनमध्ये कोळसा, २५,३८० वॅगनमध्ये कंटेनर, ५,१८३ वॅगनमध्ये पेट्रोलियम उत्पादने, १,८०२ वॅगनमध्ये खते, ६३५ वॅगनमध्ये स्टील, २५२ वॅगनमध्ये डी-आॅइल केक आणि ११७ वॅगनमध्ये सिमेंट व १,७७२ वॅगनमध्ये विविध वस्तूंची वाहतूक केली. याचबरोबर सुमारे २२० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालविल्या जात असून, त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग इत्यादी आवश्यक वस्तू देशभरात पोहोचविल्या. मध्य रेल्वेने २१ एप्रिलपर्यंत २००० टनाहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली होती. ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, ज्यूट बियाणे, टपाल पिशव्या आणि कच्चा माल समाविष्ट आहे.

Web Title: Central Railway transports 70,374 wagons in 1,415 racks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.