केंद्रीय पथकाने केली मूर्तिजापुर तालुक्यात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:16 AM2021-04-14T04:16:49+5:302021-04-14T04:16:49+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यूदर झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पथकाने तालुक्याचा आढावा घेतला. शहरात ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यूदर झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पथकाने तालुक्याचा आढावा घेतला.
शहरात आगमन होताच डॉ. मनीष चतुर्वेदी व डॉ. महेश बाबू यांच्या पथकाने डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर व लसीकरण कक्षाला भेट देऊन माहिती घेतली. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली. नवनिर्माण ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पथकाने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या प्रतीकनगर, शिवाजीनगर व सिंधी कॉलनीत जाऊन माहिती घेतली. त्यानंतर हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन सुविधांची पाहणी केली व कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मुख्याधिकारी विजय लोहकरे, डॉ. सोनोने, डॉ. राजेंद्र नेमाडे, निवासी नायब तहसीलदार राजू डाबेराव यांची उपस्थिती होती. (फोटो)
-------------------------------------
बोरगाव मंजूतही घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
बोरगाव मंजू : केंद्रीय पथकाने ॲलोपथी रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पथकातील अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या, सक्रिय रुग्णांची संख्या, लसीकरण याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर डॉ. मनीष चतुर्वेदी यांनी उपस्थित आशा वर्कर यांच्याशी संवाद साधून वार्डनिहाय माहिती घेतली. त्यानंतर पथकाने बोरगाव मंजूतील प्रतिबंधित क्षेत्र असेलल्या रेणुका नगरमध्ये भेट देऊन होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.