कोवीड चाचणीची ‘सीइओं‘कडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:50+5:302021-04-24T04:18:50+5:30
........................................... ग्रामसेवक करणार आर्सेनिक गोळ्यांचे वाटप अकोला: कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप ...
...........................................
ग्रामसेवक करणार आर्सेनिक गोळ्यांचे वाटप
अकोला: कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत २६ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करणार आहेत.
.............................................
जिल्हाधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन प्लँटची पाहणी
अकोला: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयालयातील ऑक्सिजन प्लँट आणि कोविड कक्षाची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ.नीलेश अपार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
.......................................
शिक्षकांची माहिती संकलनाचे काम सुरू
अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांची माहिती संकलनाचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. या माहितीचा आढावा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवारी घेणार आहेत.
..............................................