जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारावर 'सीईओं'चा अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:58 PM2019-03-19T12:58:36+5:302019-03-19T12:58:43+5:30

गेल्या काळातील कामे पुन्हा तपासणी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीतच दिल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

CEOs' crackdown on corruption in Zilla Parishad | जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारावर 'सीईओं'चा अंकुश

जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारावर 'सीईओं'चा अंकुश

Next

अकोला: जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांकडून अदा करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयात येणाऱ्या देयकांपोटी पैसे घेणे बंद करा, त्यामध्ये एकदा त्रुटी काढल्यानंतर पुन्हा काढली जाणार नाही. तसेच कामांच्या तपासणीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील संबंधितांनी कामे पाहूनच देयके अंतिम करावी, त्यासाठी गेल्या काळातील कामे पुन्हा तपासणी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीतच दिल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी विविध विभागातील कामकाजात सुधारणा करण्यासोबतच पैशांसाठी होत असलेल्या अडवणुकीवर त्यांनी बोट ठेवले. कमी-अधिक प्रमाणात जिल्हा परिषदेत सर्वत्र आढळणाºया या प्रवृत्तीला लगाम लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यपालन अहवालातच मुद्यांवरील उपायांची नोंद केली. त्यामुळे आता संबंधित अधिकारी-कर्मचाºयांच्या तोंडाला हिरव्या कुरणात मुसके लावण्याचा आभास होत आहे.
- भ्रष्टाचार रोखण्याची अर्थ विभागाला ताकीद
अर्थ विभागाला दिलेल्या निर्देशानुसार देयक काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांनी एक रुपयाही घेऊ नये, जिल्हा कोशागार अधिकारी कार्यालयातही पैसे दिले जाणार नाहीत. कोणत्याही देयकातील त्रुटी एकदाच काढल्या जातील. वारंवार त्रुटी काढण्यावर बंदी आणण्यात आली. अर्थ विभागाचा ताळमेळ सादर करावा, ३१ मार्चपर्यंत खाते शून्य बचतीवर आणावे, देयक २० मार्चपर्यंत सादर करावी, ३१ तारखेपर्यंत अदा केली जातील. सर्व रोखवह्यांची तपासणी करावी, अशी ताकीद मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे.एस. मानमोठे यांना देण्यात आली.
- बांधकामाचे अभियंतेही लावले कामाला
बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी प्रत्येक कामाला भेट द्यावी, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एकच व्यवस्था निर्माण करावी, बांधकामाची सर्व यादी उपअभियंत्याकडे असावी, यासह गटविकास अधिकाºयांनी कामाला भेटी देण्याचेही बजावण्यात आले.
- दहिहांडा, उरळ येथील कामांची तपासणी
दहिहांडा येथे काम न करताच केवळ रंगकाम झाले आहे. त्यामुळे त्या कामाला अकोला उपविभागाचे उपअभियंता श्रीकांत जोशी यांनी भेट देऊन पाहणी करावी, उरळ येथे उपअभियंत्यासह गटविकास अधिकाºयांनी भेट देऊन अहवाल सादर करण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बजावले आहे.

 

Web Title: CEOs' crackdown on corruption in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.