‘सीइओं’नी घेतली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:32 AM2021-03-04T04:32:32+5:302021-03-04T04:32:32+5:30
.............................................................. ऑनलाइन सभेची तयारी अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ४ मार्च रोजी ऑनलाइन पध्दतीने ...
..............................................................
ऑनलाइन सभेची तयारी
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ४ मार्च रोजी ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सभेच्या नोटीस जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्हा परिषद सदस्यांना पाठविण्यात आल्या असून, ऑनलाइन सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
...............................
कार्यालयांमधील वर्दळ कमी
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी ‘लाॅकडाऊन’ लागू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर गत आठवडाभरापासून अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह, जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयांच्या परिसरात नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे.
.........................................
कोविड सेंटरची पाहणी
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता अकोला शहरात प्रशासनामार्फत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्यामध्ये सोमवारी समाजकल्याण विभागांतर्गत वसतिगृह, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयअंतर्गत वसतिगृह येथील कोविड केअर सेंटरमधील व्यवस्थेची पाहणी अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी नीलेश अपार यांनी केली.