‘सीइओं’नी घेतली आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:17 AM2021-04-13T04:17:57+5:302021-04-13T04:17:57+5:30

................................................................ दंडात्मक कारवाइची घेतली माहिती! अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आदी नियमांचे ...

The CEOs held a review meeting | ‘सीइओं’नी घेतली आढावा बैठक

‘सीइओं’नी घेतली आढावा बैठक

Next

................................................................

दंडात्मक कारवाइची घेतली माहिती!

अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाइ करण्यात येत आहे. त्यानुषंगाने अकोला उपविभागात करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाइची माहिती अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ.नीलेश अपार यांनी सोमवारी घेतली.

.....................................................

लाभाथी शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत करा!

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्यांमधील नाव, पत्ता आदी प्रकारची दुरुस्तीची कामे करुन लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने अद्ययावत करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सोमवारी जिल्ह्यातील संबंधित नायब तहसीलदारांना दिले.

..................................................................................

थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू!

अकोला: जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दोन पथकांमार्फत राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनांतर्गत गावांत भेटी देऊन थकीत पाणीपट्टी रक्कम वसूल करण्यात येत आहे.

........................................................

Web Title: The CEOs held a review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.