अनुदानित दराने कडधान्य बियाणे उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:51 AM2020-12-04T04:51:28+5:302020-12-04T04:51:28+5:30
शेतकऱ्यांना दर्जेदार, प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणाचा (१० वर्षाआतील व १० ...
शेतकऱ्यांना दर्जेदार, प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणाचा (१० वर्षाआतील व १० वर्षावरील) प्रचार प्रसार व्हावा. तसेच शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे अनुदानित कडधान्य व गहू पिकाची बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तसेच ग्राम बीज उत्पादन (SVS) अंतर्गत गहू पिकाच्या १० वर्षाआतील वाणास रु. १०/-प्रतिकिलोप्रमाणे व १० वर्षावरील वाणास रु. १०/- प्रतिकिलोप्रमाणे अनुदानित दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. हरभरा पिकाच्या १० वर्षाआतील वाणास रु. १२/-प्रतिकिलोप्रमाणे व १० वर्षावरील वाणास रु. १२/- प्रतिकिलोप्रमाणे अनुदानित दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महाबीज, अकोलामार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांद्वारे तालुकानिहाय हरभरा व गहू पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे हरभरा पिकाच्या अनुदानित दराने प्रमाणित बियाणाचा लाभ घेण्याकरिता मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिकृत बियाणे वितरकाकडून अनुदानित दराने प्रमाणित बियाणे खरेदीचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी तसेच महाबीज, अकोला यांच्या अधिकृत वितरकांशी संपर्क साधावा.