बोरगाव येथे कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:26+5:302021-07-22T04:13:26+5:30

बोरगाव मंजू : कोविड-१९ काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ...

Ceremony in honor of Kovid warriors at Borgaon | बोरगाव येथे कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा

बोरगाव येथे कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा

Next

बोरगाव मंजू : कोविड-१९ काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविकांसह वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आदींनी सेवा केली. या कार्याची दखल घेऊन संघर्ष बहुउद्देशीय संस्थेने कोविड योद्ध्यांंचा सन्मान सोहळा स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी आर. बी. हिवाळे प्रकल्प अधिकारी, सहआयुक्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (अकोला) होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक विजयकुमार गडलिंगे होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली पवार, संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव संजय वानखडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. बी. हिवाळे यांनी विचार व्यक्त केले. दरम्यान, उत्कृष्ट कामगिरी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली पवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. श्रुती गिरे, डॉ.राहेमीन खान, विलास खडसे, आनंद डांबरे, दीपाली मालवे, वर्षा ठाकरे, प्रियंका वाकोडे, आशा लाडगे, संगीता ओळंबे, अनुकूल ठाकरे, वर्षा ढोके, संत गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे प्रा. संजय तिडके, रोहन बुंदिले, हर्षल पाटील, सचिन काळे, अखिलेश अनासाने, ज्ञानेंद्र पर्वते, वैष्णवी असेकार, ईशा मेसरे, राजश्री इंगळे, महिला पत्रकार छाया सनिसे, सामाजिक क्षेत्रात कार्यरत रामेश्वर शेगोकार, दिनेश चिकटे आदींचा सन्मान करण्यात आले. याप्रसंगी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष देवीदास अंबुलकर, विलासराव देशमुख, सखाराम वानखडे, भाऊराव वानखडे, दादाराव चौरपगार, देवीदास उमाळे, न्यामत शहा, पत्रकार सिद्धार्थ कांबळे, पत्रकार संतोष गवई आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय वानखडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक पंजाबराव वर यांनी केले, तर आभार पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी मानले.

Web Title: Ceremony in honor of Kovid warriors at Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.